सहकारमंत्र्यांची सावली हरवली; संजय जगदाळे कोरोनाने गेले | Latest Marathi News



कराड :
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना सतत सावलीप्रमाणे साथ देणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय शामराव जगदाळे (वय ५०) यांचे आज कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने शिरवडे, मसूर परिसरासह कराड तालुक्याला मोठा धक्का बसला आहे. 

संजय जगदाळे हे बाळासाहेब पाटील यांचे सच्चे कार्यकर्ते होतेच, पण गेली अनेक वर्षे त्यांनी पाटील यांना सावलीप्रमाणे साथ दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ते बाळासाहेबांचे राईट हँड मानले जात होते. उंचपुरे, धिप्पाड असे प्रभावी व्यक्तीमत्व जगदाळे यांना लाभले होते. मनमिळावू, हसतमुख व सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव होता. मूळचे कराड तालुक्यातील शिरवडे गावचे असलेल्या जगदाळे यांचा तालुक्यासह जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार होता.

१४ ऑगस्टला बाळासाहेब पाटील यांनाच कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात हलवले होते. कोरोनावर मात करून ते नुकतेच जिल्ह्यात परतले आहेत. दरम्यान, मागच्या पाच - सहा दिवसांपासून संजय जगदाळे यांना त्रास जाणवत होता. परंतु बाहेरील वातावरण पाहता सुरूवातीला त्यांनी अंगावर काढले. 

दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कराडच्या कृष्णा रूग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. त्यांना कोल्हापूरला नेण्याचा सल्लाही देण्यात आला. तथापि, नंतर त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्याही ठिकाणी त्यांना लवकर व्हेंटिलेटर मिळू शकला नाही असे वृत्त आहे. अखेर आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. 


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या