Wildlife Story : स्टार कासव आणि पैशाचा पाऊस


एक दुर्मिळ प्रजाती, अप्रतिम कलाकृती पण अनेक गैरसमजुतींची पनवती

Wildlife Story : भारतीय स्टार कासवाच्या अनुषंगाने सर्वत्र अनेक अंधश्रद्धा व गैरसमजुती आहेत. स्टार कासव घरी असणे शुभ मानले जाते. ते तुमच्याजवळ असेल तर तुमच्याइतके भाग्यवान कोणी नाही. अशा घरावर पैशाचा पाऊस पडतो अशी समजूत आहे. यासह विविध कारणांसाठी स्टार कासवाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते.

भारतीय स्टार कासव ही एक दुर्मिळ प्रजाती असून या प्रजातीस कोरडे, रेताड, खडकाळ हवामान लागते. गवत, फळे, फूल आणि झाडांची पाने असा त्यांचा आहार असतो. हे कासव भारतात गुजरातमधील कच्छ, राजस्थान, ओरिसा, मध्य महाराष्ट्र अशा ठराविक ठिकाणी सापडतात. 

कारावास व दंडाची तरतूद

स्टार कासव पाळणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार प्रतिबंधित आहे.ध ही प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार शेडूल १ भाग क मध्ये समाविष्ट असून याची विक्री करणे, पाळणे, शिकार करणे हा कायद्याने गुन्हा असून याला कायद्यात दहा हजार दंड व सात वर्ष कारावास अशी तरतूद आहे.

पाठीवर पिरॅमिडसारखी कलाकृती 

कासवांच्या अनेक प्रजाती आहेत. अंधश्रद्धेपोटी औषधे, धार्मिक विधी करणे या कारणांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणात कासवाची तस्करी केली जाते. स्टार कासवाच्या पाठीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर आकृती असते. हे चित्र एका पिरॅमिडसारखं दिसतं. त्यांचं सौंदर्य पाहूनही काही लोक या कासवांची तस्करी करतात. घरासाठी शुभ आणि पैशांचा पाऊस पाडणारा प्राणी म्हणून अनेक घरांत छुप्या पद्धतीने पाळण्यात येणाऱ्या स्टार कासवाच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी जाहीर झाली आहे.

सर्वाधिक संरक्षित वर्गातील प्राणी

स्टार कासव  हा भारतातील सर्वाधिक तस्करी होणारा आणि वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित वर्गातील प्राणी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीत या कासवाला संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यांचं आयुष्य २५ ते ८० वर्षांमध्ये असतं. या कासवांची लांबी १० ते ३८ सेंटिमीटरपर्यंत असू शकते. तसंच त्यांचं वजन १००० ते ६००० ग्रॅम म्हणजेच १ ते ६ किलोपर्यंत असू शकतं. भारताता छोट्या आणि मध्यम आकाराचे स्टार कासव आढळतात. पंधरा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत स्टार कासवाची विक्री होत असते असे सांगितले जाते.

आणखी एक काळी बाजू...

कासवांच्या या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील आणखी एक काळी बाजू म्हणजे हे कासव लहान असेपर्यंत घरात ठेवले जाते. मात्र अनेकदा ते मोठे झाले की, घराबाहेर पाणथळ जागी सोडून दिले जाते. एवढेच नाही, तर पेट शॉपच्या बाहेरही कासवे सोडून दिलेली आढळली आहेत.

- रोहन भाटे

मानद वन्यजीव रक्षक तथा

वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या