खेडला शिकणाऱ्या सातारच्या युवकाचा मेढ्याजवळ अपघाती मृत्यू
Satara News : रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकी धडकून दुघटना घडली. आदित्य संजय साळुंखे (वय २३, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा) असे दुर्दैवी भावाचे नाव आहे.
आदित्य हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील योगिता डेंटल कॉलेजला बीडीएसच्या चौथ्या वर्षात शिकायला होता. रक्षाबंधनानिमित्त तो पल्सर मोटरसायकलवरून पोलादपूर, महाबळेश्वरमार्गे सातारला यायला निघाला होता. इतका लांबचा प्रवास सुरक्षितपणे पार पडला असताना आणि सातारा अवघ्या २४ किलोमीटर अंतरावर आला असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.
अपघातात हेल्मेटही तुटले
रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास सातारा बाजूकडून आलेली एसटी बस स्थानकात जाण्यासाठी उजवीकडे वळली. त्यावेळी साताराच्या दिशेने येत असलेल्या आदित्यची मोटरसायकल अचानकपणे आडव्या आलेल्या एसटीवर आदळली. या अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला. त्याचे हेल्मेटही तुटले.
अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी अपघात स्थळी धाव घेतली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य बोलू शकत होता. त्याने आपल्या भावाला फोन करण्यास सांगितले. त्यावेळी त्याच्या घरच्यांना कळवतानाच लोकांनी जखमी आदित्यला मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पण तो गंभीर जखमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सातारला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात हलवण्यात सांगितले. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून त्याला सातारला हलवण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला होता.
कुटुंबीयांसह मित्रांना धक्का
आदित्यच्या अपघाताची माहिती कळताच सर्वांना धक्का बसला. त्याचे कुटुंबही शोकसागरात बुडून गेले. त्याच्यासोबत खेडला शिकणाऱ्या त्याच्या मित्रांनी अन्य वाहन बघून सातारला धाव घेतली. रात्री साडेदहाच्या सुमारास अपघात झाला असतानाही सकाळी साडेदहाला चौकशी केली तरी मेढा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
Yogita dental College (khed), Satara Mahabaleshwar road, Satara police
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या