प्रवाशांचे हाल होण्यास कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Satara News : लाडकी बहीण योजनेचा डांगोरा पिटण्यासाठी जिल्ह्या - जिल्ह्यात होत असलेल्या मेळाव्यांना महिलांची गर्दी जमवण्यासाठी एसटीचा सर्रास वापर केला जात आहे. यामध्ये लाखो प्रवाशांचे नाहक हाल होत असल्यामुळे या तुघलकी कारभाराविरोधात मंगळवारी साताऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भरपावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सातारा बसस्थानकाच्या आऊट गेटवर आक्रमक शिवसैनिकांनी हा रास्ता रोको केला. यावेळी शिवसेना झिंदाबाद, मिंधे सरकारचं करायचं काय.. खाली मुंडी वर पाय, ५० खोके एकदम ओके अशा जबरदस्त घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या असंख्य बसेस जवळपास अर्धा तास अडकून पडल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेला आल्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी घेतल्यामुळे वातावरण तापले.
फेऱ्या अचानक रद्द झाल्याने हाल
आठवडाभरापूर्वी साताऱ्यात लाडकी बहीण योजनेचा डांगोरा पिटण्यासाठी घेतलेल्या मेळाव्याला महिलांना आणण्यासाठी सातारा जिल्ह्यात जवळपास चारशे बसेस वापरल्या गेल्या. त्यामुळे जिल्हाभरातील एसटीच्या सुमारे दोन हजार फेऱ्या अचानक रद्द झाल्या. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर फार मोठा गोंधळ उडाला. नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
गणेश विसर्जनासारख्या उत्सवावेळी वाहतुकीत कशा पद्धतीने बदल असेल याचे प्रकटीकरण जिल्हा पोलीस दलातर्फे आधीच दिले जाते. पूर्वसूचना मिळाल्यामुळे लोकांना त्या पद्धतीने नियोजन करता येते. मात्र मेळाव्यादिवशी फेऱ्या रद्द होणार असल्याबाबत विभाग नियंत्रकांच्या वतीने आधी दोन दिवस प्रवाशांना पूर्वकल्पना द्यायला हवी होती. ती न दिल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. हा एसटीच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा असून हे अधिकारी जनतेला गृहीत धरून चालतात का ? यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु त्यावर कसलीही कारवाई न झाल्यामुळे आज हे आंदोलन करावे लागत असल्याचे सचिन मोहिते यांनी याप्रसंगी सांगितले.
भाडे मिळाले की नाही याचा खुलासा व्हावा
सातारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नवीन बसेसची खरेदी झालेली नाही. आहे त्यातील असंख्य बसेस भंगारात गेल्या आहेत. सध्या जवळपास साडेसहाशे बसेस असताना प्रवाशांना वेठीला धरून त्यातील चारशेवर बसेस मेळाव्यासाठी देणे हा तुघलकी कारभारच आहे. या गाड्यांचे भाडे महामंडळाला मिळाले की नाही याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
या आंदोलनात सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, रूपेश वंजारी, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अनिल गुजर, सागर धोत्रे, अजय सावंत, तेजस पिसाळ, रवींद्र चिकणे, आझाद शेख, अक्षय वाघमारे, आरिफ शेख, परवेझ शेख, आनंद देशमुख, सुनील मोहिते, सचिन जगताप यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते.
शासकीय पैशाची उधळपट्टी शिवसेना खपवून घेणार नाही
सातारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नवीन बसेसची खरेदी झालेली नाही. आहे त्यातील असंख्य बसेस भंगारात गेल्या आहेत. सध्या जवळपास साडेसहाशे बसेस असताना प्रवाशांना वेठीला धरून त्यातील चारशेवर बसेस मेळाव्यासाठी देणे हा तुघलकी कारभारच आहे. या गाड्यांचे भाडे महामंडळाला मिळाले की नाही याचा खुलासा होणे गरजेचे आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार व शासकीय पैशाची उधळपट्टी शिवसेना खपवून घेणार नाही असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी यावेळी दिला.
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray), ladki bahin Yojana, MSRTC
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या