खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी खूषखबर; नवीन रुग्णांची मोफत तपासणी
Satara News : कमी वेदना, कमीत कमी रक्तस्त्राव, कमीत कमी नुकसान, जलद रिकव्हरी या वैशिष्ट्यांमुळे रोबोटिक सर्जरी उपयुक्त ठरली आहे. या सर्जरीमधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या रविवारी (दि. २३) खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे येणार आहेत.
डॉ. सौरभ गिरी हे सध्या पुण्याच्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट अँड रिप्लेसमेंट विभागाचे प्रमुख आणि एकॉर्ड हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी नवीन नाव नोंदणी करणाऱ्या रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत होईल. तसेच फॉलोअप रूग्ण व नवीन रुग्ण यांना एक्सरे तपासणीमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण
डॉ. सौरभ गिरी यांनी सांगितले की, पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फलदायी व सुखकारक आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळता येतात. संक्रमणाचा धोकाही कमी असतो. रक्तस्त्राव कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर रिकव्हर होतो. त्यामुळे त्याचा रुग्णालयात ॲडमिट होण्याचा कालावधी कमी राहतो. विशेष म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्णाला चालता येते. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया खुबा व गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
डॉ. गिरी हे रुग्ण तपासणीसाठी २३ मार्च रोजी दुपारी तीनपासून सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार, सातारा येथे उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१६८४३२४३२ या हेल्प लाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.
Satara Diagnostic Centre, Dr. Sourabh Giri
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या