Satara News : विकी खताळ टोळीला दणका


साताऱ्यासह पुणे, सोलापूर जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार

Satara News : सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विकी खताळ टोळीला पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. टोळी प्रमुख विकी ऊर्फ बाळू बापुराव खताळ (वय २३) याच्यासह तिघांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

विकी खताळ, शुभम ऊर्फ सोनू आप्पासो घुले (वय २३) व सुयोग हिंदुराव खताळ (वय २७, तिघेही रा. कापडगांव, ता. फलटण, जि. सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. दुखापत पोचवून शिवीगाळ, दमदाटी करणे, चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा तसेच पुणे, सोलापूर जिल्हा हद्दीतून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल आर. धस यांनी केली होती.

धाक न राहिल्यामुळे कारवाई

या टोळीतील इसमांवर दाखल गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. लोणंद तसेच परिसरामध्ये सातत्याने ते गुन्हे करीत होते. कायद्याचा कोणताच थाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी होऊन त्यांनी या टोळीस सातारा तसेच पुणे, सोलापूर जिल्हा हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, अनुराधा सणस, लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन भोसले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव, स्नेहल कापसे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या